*धाड* येथे ट्रिपल सीट व विना लायसन्स वाहनचालकांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

 *धाड* येथे ट्रिपल सीट व विना लायसन्स वाहनचालकांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

३४ वाहनांवर कारवाई; २७ हजार रुपयांचा दंड वसूल
धाड | दि. १५ डिसेंबर २०२५
आज दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन धाडचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाड येथे ट्रिपल सीट व विना ड्रायव्हिंग लायसन्स मोटरसायकल चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहीम सुमारे एक ते दीड तास चालली. या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ३४ दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने नागरिकांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर, वैध ड्रायव्हिंग लायसन्स व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहिमेत सहभागी पोलीस पथक
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस (ठाणेदार, पो.स्टे. धाड),
सफौ प्रभाकर लोखंडे,
पोहेकॉ रविंद्र बऱ्हाटे,
पोहेकॉ श्रीकृष्ण चव्हाण,
नापोकॉ युवराज मुळे,
पोकॉ देवेंद्र मुळे,
कुमोद जाधव, सतीश जाधव, भास्कर जाधव,
अनिल ताम्हणे, राजू माळी
तसेच महिला अंमलदार वैशाली कोरडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
📢 अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘सिल्लोड एक्सप्रेस (SX न्यूज)’ ला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Recent

Random Post