वांगी बुद्रुक येथे घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळुन खाक

वांगी बुद्रुक येथे घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळुन खाक

* पिडीत कुटुंबाची शासनाकडे मदतीची मागणी* सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील शेख फेरोज शेख कालु यांच्या राहत्या पत्र्याच्या शेडला अचानक आग लागून संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाल्याची घटना सोमवार रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान घडली होती.मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आगीचे लोळ उठतांना दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी व शेख कुटुंबांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीची दाहकता मोठी असल्यामुळे पत्र्याचे शेड तसेच शेडमधील सर्व साहित्य जळुन खाक झाले.गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांनी सदरील घटनेची माहिती महसुल विभागाला दिली असता महसूल विभागाच्या धानोरा सजाच्या तलाठी रुक्मीणी माने यांनी घटनास्थळी येऊन आगीत खाक झालेल्या संसार उपयोगी साहित्याचा पंचासमक्ष पंचनामा केला असता लागलेल्या आगीत ऐंशी हजार ते एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले.मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेख कुटुंबाचे लागलेल्या आगीत पत्र्याचे शेड,जीवनावश्यक वस्तूसह आदी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेख कुटुंब हतबल झाले आहे त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केलेली आहे.पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे मागील चार ते पाच दिवसांपासून शेख फेरोज हे आपल्या पत्नीसह मुलाच्या घरी झोपण्यासाठी जात असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.यावेळी पंचनामा करतेवेळी ग्रामसेवक एल आर कोळी, सरपंच बापुराव काकडे,पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष भारत काकडे, माजी पोलीस पाटील भगवान साळवे,पंडीत काकडे,युनुसखा पठाण,गजानन काकडे,नानासाहेब गायकवाड,शेख फेरोज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने