अंधारीच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

अंधारीच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू* प्रतिनिधी जाकेर बेग
घरातील कर्ता पुरुष गेल्याने उबाळे कुटुंब उघड्यावर,उबाळे यांना वडिलोपार्जित एक एकर जमीन असून त्यांच्या वडिलांचे अठरा वर्षी पूर्वी निधन झाले, तसेच लहान भाऊ गणेश यांचे निधन झाले आहे त्यांच्या वर पूर्ण घराची जबाबदारी होती.
हा निव्वळ एक योगायोग समजावा की प्रभाकर उबाळे यांनी बुधवारी जो फोटो काढला त्यांच्या मागे संत चोखामेळा यांचा अभंग आहे त्यावर असे नमूद (लिहिले) केले आहे :जन्माला देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची पण हे अवघे सुखाचे संगती अंतकाळी होते पाठीमोरे चोका म्हणे याचा न धरी भरवसा शरण जा सर्वेशा विठोबासी
अंधारी वृत्तसेवा सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील भाविक प्रभाकर उबाळे वय (42) श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत भाविकाचा बुडून मृत्यू झाला,
 ही घटना मंगळवारी दुपारी घडली प्रभाकर सांडू उबाळे वय 42 राहणार अंधारी तालुका सिल्लोड असे बुडून मृत्यू झालेले भाविकांचे नाव आहे.अंधारी येथून प्रभाकर उबाळे मित्रासोबत आषाढीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते.बुधवारी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत अंघोळीसाठी गेले असता ते बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्यामुळे सोबतचे भावीक घाबरले आरडा ओरड केली असता अनेकांनी धाव घेतली तसेच शोध कार्य करूनही जवळपास तीन तास त्यांच्या या नदीतील पाण्या मध्ये शोध लागला नाही,
त्यामुळे शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले अग्निशम दलाने
बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नदीतील पाण्यातून प्रभाकर उबाळे यांच्या मृतदेह बाहेर काढला त्यानंतर तेथील शासकीय रुग्णालय शवविच्छेदन करून  त्यांच्या मृत्यूदेह रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला
गुरुवारी सकाळी अंधारी येथे उबाळे वस्तीवर त्यांच्या अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पाश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊजाई, पुतण्या, असा परिवार आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3