सोयगाव तालुक्यातील पळसखेड येथे जोरदार पावसामुळे नदी नाल्यानां पुर ..अपूर्ण राहिलेल्या पुलामुळे नागरिकांना नाहक त्रास

सोयगाव तालुक्यातील पळसखेड येथे जोरदार पावसामुळे नदी नाल्यानां पुर ..अपूर्ण राहिलेल्या पुलामुळे नागरिकांना नाहक त्रास  सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण.दिनांक 15 जुलै सोमवार रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे  सोयगाव तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले..पळासखेड गावातील दोन भागाना जोडणाऱ्या रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती पळासखेडा वाकोद ला जोडणारा  जळगाव व संभाजीनगर जाण्यासाठी सुद्धा हाच मार्ग आहे या नाल्याच्या पुलावरून 4-5 फूट उंचीवरुन पाणी राहत होते पळासखेड व जळगाव जिल्ह्यातील वाकोद जाण्यासाठी मध्ये एक पुल आहे या पुलाची मागील दोन वर्षापासून दूरदशा  झाली आहे मात्र याकडे स्थानिक प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कुठलेही लक्ष नाही या पुलाचे दोन तीन वेळा उद्घाटन झाले पण काम काही चालू होईना या पुलाच्या वरून पाऊसाचे पाणी वाहत असल्याने  जवळपास तीन तास हा रस्ता बंद होता त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या तर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या पुलाचे काम कधी मार्गी लागणार व प्रशासनाला या कामाची कधी सुध येणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे पुढारी निवडणूकच्चा वेळी आश्वासनांची भडीमार करतात तर प्रत्यक्षात काहीच कामे करत नाही या अशा पुढाऱ्यांच्या खोट्या आश्वासनामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3