काही परिहार्य कारणास्तव पोलिस भरती रद्द.
धुळे.१९.(गोकुळ देवरे)राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६.धुळे येथे दिनांक ११/७/२०२४ते २४/७/२०२४.या कालावधीत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणी प्रक्रीया राबविण्यात येत आहे.सदरची प्रक्रीया श्री.विजयकुमार चव्हाण, समादेशक,रा.रा.पो.बल गट क्र.१०.सोलापुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. प्रभाकर शिंदे,रा.रा.पो.बल गट क्र.०६.धुळे यांच्या अध्यतेखाली अतिशय सुरळीत,पारदर्शक आणि स्पर्धात्मक वातावरणात राज्य राखीव पोलीस बल गट क्र.०६.धुळे येथील कवायत मैदानावर सुरु आहे,भरतीसाठी आदल्या रात्री येणाऱ्या उमेदवारांची गटातील समारोहम मंगल कार्यालयात निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून,मैदानी चाचणी दरम्यान भरती मैदानावर उमेदवारांना शासकीय खर्चातुन केळी तसेच सशुल्क तत्वावर भोजन व नाष्टयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक १९/७/२०२४ पावेतो८५७३उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणी प्रक्रीया पूर्ण झालेली आहे.या भरती प्रक्रीयेतील दिनांक २०/७/२०२४ ते २२/७/२०२४ या कालावधीतील कामकाज अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकण्यात आले आहे. त्यामुळे पुढील भरती प्रक्रीयेचे नियोजनात अंशतः बदल करण्यात आला असून, उर्वरित उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणी दिनांक २३/७/२०२४ ते २६/७/७२०२४या कालावधीत घेण्यात येणार आहे.याअनुषंगाने दिनांक २०/७/२०२४ते २४/७/२०२४या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ०६.धुळे येथे शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणीसाठी बोलविलेल्या उमेदवारांचे सुधारीत प्रवेशपत्र त्यांनी आवेदन अर्जावर नमुद केलेल्या ई- मेल आय डी वर पाठविण्यात आले आहेत.
त्यामुळे अशा उमेदवारांनी त्यांचे मेल आय डी तपासून सुधारीत प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्यावावत व सुधारित दिनांकानुसार शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे अवाहन श्री.प्रभाकर शिंदे, समादेशक,राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ०६.धुळे यांनी केले आहे.
