हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनिर्वाचित खासदार मा.श्री. कल्याणजी काळे साहेबांचा जंगी सत्कार! जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी!

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनिर्वाचित खासदार मा.श्री. कल्याणजी काळे साहेबांचा जंगी सत्कार!  जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी! 

घाटनांद्रा: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे जालना लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा. श्री. कल्याण काळे साहेबांची आज त्यांच्या छत्रपती संभाजीनगर राहते घरी भेट घेऊन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे जंगी सत्कार करण्यात आले. खासदार श्री. कल्याण काळे साहेब यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी परंपरेनुसार पुष्पगुच्छ न देता पुस्तक, एक शानदार मोमेंटो (शिल्ड) अणि शाल देऊन नूतन खासदार मा. कल्याण काळे साहेब यांचा सत्कार करण्यात आले तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त आगाऊ शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीस व कार्यासाठीही शुभेच्छा देण्यात आले. शेख अब्दुल रहीम सर यांनी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन अणि महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे कार्याची माहिती दिली. देशाचे मोठे सासंद ( लोकसभेत)  जूनी पेन्शन मुद्दा मांडावा अशी विनंती केली. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे भावी अध्यक्ष तथा शेख अब्दुल रहीम सर यांचे चिरंजीव जिशान अहमद अणि इतर सहकारी उपस्थीत होते...


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3