जंगला तांडा येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचे शिल्पकार असून त्यांचे कार्य व विचार संपूर्ण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहेत असे प्रतिपादन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. जंगला तांडा ता. सोयगाव येथे आयोजित माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी तसेच तरुणांना कृषी क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी स्व. वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठांची निर्मिती केली.कापूस एकाधिकार योजना, पाणी आडवा पाणी जिरवा, हरितक्रांती, धवलक्रांती,जलक्रांती यासारख्या योजना राबवल्या. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.फर्दापूर शिवारात उभारण्यात येणार संत सेवालाल महाराज स्मारकजगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील फर्दापूर शिवारात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच भीमपार्कच्या धर्तीवर संत सेवालाल महाराज स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देवू असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.स्व.वसंतराव नाईक जयंती उत्सव थाटात जंगला तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जयंती महोत्सव थाटात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक वाद्य, स्व. वसंतराव नाईक, संत सेवालाल महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमात पावसाचे आगमन झाले होते तरी पावसात देखील उपस्थितांचा उत्साह कायम होता.बंजारा समाजच्या वतीने ना. अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार ना. अब्दुल सत्तार यांचा जंगला तांडा गावात आगमन होताच समाज बांधवांनी त्यांचे पारंपरिक पध्दतीने गीत व नृत्य सादर करीत भव्य स्वागत सत्कार केला. समाज बांधवांनी केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून या सत्कार सोहळ्याने भारावून गेलो असल्याची भावना ना. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.मंत्री अब्दुल सत्तार यांनी परिधान केला बंजारा समाजाचा पोशाख सोयगाव तालुक्यातील बंजारा समाजात मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रचंड लोकप्रियता आहे. समाजाच्या होळी व इतर सण उत्सवात ना. अब्दुल सत्तार नेहमी सहभागी होतात. ना. अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमात बंजारा समाजाचा पारंपरिक पोषाख परिधान केला होता. नेहमी टोपी रुमाल परिधान करणारे अब्दुल सत्तार यांना बंजारा समाजाच्या पोषाखात पाहताच जमाज बांधवांचा उत्साह द्विगुणित झाला.महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा राज्यातील सरकार हे लोककल्याणकारी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना व निर्णय घेतले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्वकांक्षी योजना असून पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.यांची होती उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,माजी जि. प. सदस्य गोपीचंद जाधव,माजी सभापती रामदास पालोदकर, जितसिंग करकोटक, लख्खूसिंग नाईक , माजी सभापती मुलचंद राठोड , हिरा चव्हाण , बाबू चव्हाण, श्रावण राठोड, सरपंच वसंत राठोड, विशाल चव्हाण, राणीदास चव्हाण, भरत राठोड, वरखेडी तांडा सरपंच विनोद जाधव, न्हावी तांडा सरपंच सांडू राठोड, यशवंत जाधव, मेघराज राठोड, अरविंद राठोड, जामठी सरपंच राधेश्याम जाधव, जंगला तांडा सरपंच भारत राठोड, घाणेगाव सरपंच सुरेश चव्हाण ,डॉ.सुदाम चव्हाण, डॉ. वसंत चव्हाण , मदन राठोड , देव्हारी सरपंच पंडित राठोड, मगन जाधव , राहुल राठोड , नांदा तांडा सरपंच देविदास चव्हाण, कान्हीराम जाधव , बहुलखेडा सरपंच राजमल पवार, घाणेगाव उपसरपंच हिरा राठोड यांच्यासह गणेश राठोड, विजय राठोड, भिला चव्हाण, मदन चव्हाण, जोगी राठोड, जुगराज राठोड, मिश्रिलाल राठोड, दारासिंग राठोड, संतोष राठोड, अंबादास जाधव, सोना चव्हाण, श्रावण जाधव, रमेश चव्हाण, साईराज चव्हाण, नंदलाल चव्हाण, बळीराम चव्हाण, सुमित चव्हाण आदिंसह समाजातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.