आडुळ बुद्रुकमध्ये नागरिकांचे ग्रामपंचायतीला धारेवर — नागरी समस्यांचा वाचला पाढा, उपाययोजनांची मागणी
प्रतिनिधी सिराज बागवान जी एस मराठी /30/जून/2025 पैठण तालुका
आडुळ बुद्रुक (ता. पैठण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज (30 जून) नागरिकांनी विविध नागरी समस्या घेऊन ग्रामविकास अधिकारी नारायण पाडळे यांना थेट निवेदन दिले.
पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. चिखलामुळे ये-जा करणे कठीण, रस्त्यांवर साचलेले पाणी, वाढलेले डास, आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांचा धोका निर्माण झाला आहे.
मामा नगर परिसरातील ड्रेनेज लाईन सुरळीत न चालल्यामुळे सांडपाण्याची तुंबळ अवस्था झाली आहे. त्यामुळे या समस्येचे त्वरित निवारण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
सरपंच बबन भावले यांनी “बुधवारपासून प्रलंबित कामांना सुरुवात केली जाईल,” असे तोंडी आश्वासन दिले.
या वेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
⟶ अशाच अधिक अपडेट्ससाठी भेट द्या: www.gs9n.com ⟶ व्हिडीओ बातम्या पाहा आपल्या जी एस मराठी यू
ट्यूब चॅनलवर.