पिशोर शिवारात बिबट्या व दोन पिल्ले आढळले; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिशोर शिवारात बिबट्या व दोन पिल्ले आढळले; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


(प्रतिनिधी – अस्लम शेख, पिशोर)

पिशोर परिसरातील शिवारात सोमवारी सकाळी बिबट्या व त्याची दोन पिल्ले आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष मैनाजी मोकासे यांच्या गट क्रमांक १९६ मधील वालाच्या शेतात काही महिला शेतकरी शेंगा तोडत असताना अचानक समोर बिबट्या व त्याची दोन पिल्ले दिसली. अचानक झालेल्या या प्रसंगाने घाबरलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारील शेतकरी व गावकरी घटनास्थळी धावले.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा बिबट्या गणेश मोकासे यांच्या चक्कूच्या बागेतून बाहेर आला होता. घटनेची माहिती मिळताच दैनिक सह्याद्रीचे राखणदार प्रतिनिधी जावेद शेख यांनी वनपाल रफिक पठाण यांना कळवले. त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.

पिशोर वनरक्षक बी.एस. चव्हाण, हस्ता बीटचे वनरक्षक कृष्णा माळी, वनमजूर मगरे मामा व अश्फाक शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या बिबट्या व त्याची पिल्ले पुढे सरकली असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم