चिंचोली लिंबाजी येथे दारूबंदी कायद्याखालील मोठी कारवाई

चिंचोली लिंबाजी येथे दारूबंदी कायद्याखालील मोठी कारवाई


५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

पिशोर प्रतिनिधी – अस्लम शेख

कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे पिशोर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई केली असून तब्बल ₹५,२८,५६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूच्या ४०८ बाटल्या व एक चारचाकी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ही कारवाई दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता चिंचोली लिंबाजी येथील सरकारी दवाखान्यासमोर करण्यात आली. पोलिसांनी ह्युंदाई कंपनीची संशयास्पद कार थांबवून तपासणी केली असता, आरोपी ईश्वर शामलाल जैस्वाल (वय ४३, रा. चिंचोली लिंबाजी) हा अवैधरीत्या दारू वाहतूक करत असल्याचे आढळले.

पोलिसांनी आरोपीकडून ₹२८,५६० किमतीच्या देशी दारूच्या ४०८ बाटल्या तसेच जवळपास ₹५ लाख किंमतीची कार असा एकूण ₹५,२८,५६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरताडे, बीट जमादार लालचंद नागलोत व गणेश कवाल यांनी सहभाग घेतला.

प्राथमिक चौकशीत आरोपी जैस्वाल याचा पूर्वेतिहास गंभीर असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

या प्रकरणी फिर्यादी पो.उ.नि. विश्वजीत भागवत फरताडे यांच्या तक्रारीवरून आरोपी ईश्वर जैस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

أحدث أقدم