जानोरी येथे मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वाचनालय व वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा उद्या

जानोरी येथे मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वाचनालय व वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा उद्या


जानोरी | दिंडोरी तालुका प्रतिनिधी – सुनील घुमरे
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गखोल्या, अभ्यासिका तसेच ग्रामपंचायत बहुउद्देशीय सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार, दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा नामदार नरहरी झिरवाळ यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून
उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ,
दिंडोरी–पेठ उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे,
तहसीलदार मुकेश कांबळे,
शिक्षणाधिकारी सरोज जगताप,
उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज,
गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,
पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर,
गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण,
सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे,
जि.प. (इ.व.द.) उपअभियंता नितीन चौधरी,
शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर,
विस्तार अधिकारी बापू सादवे,
जानोरी केंद्रप्रमुख विजय निकम,
पं.स. दिंडोरीचे पी. जी. गोंधळी,
विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी,
विस्तार अधिकारी (शिक्षण) चंद्रभागा तुपे
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात पुढील लोकार्पणे व भूमिपूजन होणार आहेत –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी नवीन वर्गखोल्या इमारत लोकार्पण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभ्यासिका भूमिपूजन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका लोकार्पण
ग्रामपंचायत जानोरी बहुउद्देशीय सभागृह लोकार्पण

या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3