जिल्हा उपरूग्णालय सिल्लोड येथील भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान यांचे थकित मानधनाची चौकशी.सिल्लोड ( )सिल्लोड येथील जिल्हा उपरूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डाॅक्टर श्री अमित सरदेसाई यांच्या मनमानी कारभार ची व रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान यांचे दहा महीण्याचे थकित वेतन प्रकरणाची गंभीरतापूर्वक चौकशी करण्यात यावी असे निवेदन सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे, उपसंचालक सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद यांच्याकडे औरंगाबाद जि.काँग्रेस पक्ष चे जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी निवेदन देऊन मागणीनुसार आज शासनाने डाॅक्टर मूरंबीकर यांच्या नेतृत्वाखालील एक चौकशी समिती गठीत केली त्यात डाॅक्टर प्रदीप कुलकर्णी, डाॅक्टर सोळंकी याचा समावेश असलेली चौकशी समितीने आज रुग्णालयात दिवस भर चौकशी केली आहेत सविस्तर माहीत अशी की, सिल्लोड येथील जिल्हा उपरूग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डाॅक्टर श्री अमित सरदेसाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनमानी कारभार सूरू करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचे शंका उपस्थित झाल्यावरूण औरंगाबाद जि.काँग्रेस पक्ष चे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी सिल्लोड जिल्हा उपरूग्णालयातील कारभार वर नजर ठेवून रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान चे दहा महीण्या चे थकित वेतनाबाबत प्रकरण समोर आले . याची सविस्तर माहीत घेतली असता शासन निर्णयानुसार सरकारी रुग्णालयात प्रत्येक शस्त्रक्रिय चे भूलतज्ज्ञ डाॅक्टरास 4000/- प्रमाणे वेतन मोबदला देण्यात येईल असे नमूद आहेत तसे अक्टूबर 2018 पासून जून 2020 पर्यंत भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान ला प्रत्येक शस्त्रक्रियेचा मोबदल्यात रूपय 4000/- प्रमाणे वेतन देण्यात आले. पुढील आगस्ट 2020 पासून मे 2021 पर्यंत भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान चे शस्त्रक्रिया मोबदल्याचे वेतन थकित करण्यात आले होते याची कल्पना जेष्ठ समाज सेवक तथा माजी नगर सेवक कैसर आझाद शेख यांना मिळाल्यावर कैसर आझाद यांनी महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी तील सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे यांच्याशी व औरंगाबाद विभागीय सार्वजनिक आरोग्य विभाग चे उप संचालकाशी
प्रत्येक्ष भेटून निवेदन सादर केले. त्यानंतर शासनाने सदरिल प्रकरणात आज चौकशी करण्यात केली यात असे निर्देशाता आले की , तक्रारीच्या आगोदर भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान चे दहा महीण्याचे मानधन थकित होते तक्रारी नंतर दिनांक 15/6/2021 रोजी सदरिल भूलतज्ज्ञ डाॅक्टराचे मानधन आगस्ट 2020 ते फरवरी- 2021 पर्यंत प्रत्येक शस्त्रक्रियेला रूपय 2500/- प्रमाणे अदा करण्यात आले . दोन्ही वेळा मानधन अदा करताना तफावत चौकशीत समीती दिसून आले तसेच भूलतज्ज्ञ डाॅक्टर नदीम खान चे मार्च, ऐप्रील, मे 2021 व नंतर चे शस्त्रक्रिय चे मानधन अतापर्यंत थकित असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच वैद्यकीय अधीक्षक डाॅक्टर अमित सरदेसाई यांच्या कारभार ची सखोल चौकशी करणे आवश्यक आहेत असे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी पत्रकार समोर व्यक्त केले.