वंडर किड्स स्कुल मध्ये बालिका दिन साजरा पानवडोद :येथील वंडर किड्स स्कुल मध्ये बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

सिल्लोड एक्सप्रेस वार्ताहार सुशील कुमार
वंडर किड्स स्कुल मध्ये बालिका दिन साजरा पानवडोद :येथील वंडर किड्स स्कुल मध्ये बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंडर किड्स स्कुलचे मुख्याध्यापक श्री. अरुण चौबे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी वेळी विद्यार्थी देवेश सोनोने,अयमन सय्यद इम्तियाज शेख यांनी भाषणाद्वारे बालिका दिनाचे महत्व समजाविले. या वेळी निबंध स्पर्धेमध्ये स्वाती दौड, यशवर्धन जगताप, आलिझा सय्यद तर सुंदर वेशभूषा स्पर्धेमध्ये यशश्री दौड, सिद्धी दौड यांनी क्रमांक पटकाविला.या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सुजाता चौबे, दिपाली जगताप, दिक्षा गायकवाड, तनया गाढे आदी शिक्षकांचा समावेश होता.

Post a Comment

أحدث أقدم

Recent

Random Post