दि. 25/07/2024 *प्राथमिक आरोग्य केंद्र. आमठाणा ऊपकेद्र भराडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शिंदे मॅडम डॉक्टर सुराणा सर यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करतांना पाणी भरलेले टायर, नारळाच्या करवंट्या, भंगार साहित्य आणि इतर टाकाऊ वस्तू यामध्ये पाणी साचु देऊ नका.
ऐडीस डासांची उत्पत्ती स्थाने असणाऱ्या आणि टाकाऊ वस्तूंची वेळीच विल्हेवाट लावा.पाण्याचा हौद स्वच्छ करा. त्यांना घट्ट झाकणे बसवा. घर आणि परिसरातील पाणी वाहते करा. साठलेल्या पाण्यात रॉकेल,ऑईल टाका .आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा. घरातील कूलर आणि फ्रिजच्या मागील ट्रे मधील पाणी नियमित स्वच्छ करा असे गावातील नागरिकांना सांगण्यात आले. तसेच डेंग्यू,हिवताप,चिकनगुनिया,तसेच इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री कुलकर्णी साहेब, आरोग्य निरीक्षक सुरडकर,आरोग्य निरीक्षक चौधरी,आरोग्य सेवक आर.व्ही.उमरिया, आर.ए.चौधरी, के.बी.चौधरी,व्ही.जे.काकडे, बी.जी.धनेधर, बी.टी.अक्कलकर, एन.पी.जाधव, टी.एस.सपकाळ, आर.टी.राकडे, एस.के.बनसोड, के.डी.यादव.तसेच सर्व आशा कार्यकर्त्या यांनी सहकार्य केले.🙏
