आद्रकीच्या बेण्याला सोन्याचे दिवस शेतकरी राजा खुशाल दील: कदीर पटेल घाटनांद्रा प्रतिनिधि:
सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात यावर्षी आद्रकीच्या पिकाला बर्यांपैकी भाव मिळाला असल्याने शेतकरी राजा आद्रक लागवड करण्यासाठी बेणे काढत असल्याचे चित्र सध्या पाहवास सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात विविध ठिकाणी मिळत आहेत. तसेच सध्या आद्रक बेण्याचे दर अकरा हज्जार पर्यंत जाऊन पोहचले आहे. व सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात मका,कापुस, सोयाबीन, बाजरी, गहु, हरभरासह विविध प्रकाराचे पिक मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसेच नगदीचे पिक म्हणजे हिरवी मिर्चीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या वर्षी आद्रकीला बर्यांपैकी भाव मिळाले आहे. त्यानुसार आद्रक पिकांला यंदा बर्यांपैकी भाव मिळाला आहे. व चागंला पाऊस योग्य दर मिळेल या आशेने शेतकर्यांनी आद्रक लागवडीसाठी अद्रक बेणे काढण्यात सुरूवात केली आहे. सध्या आद्रक बेणे काढण्याची लगबग सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात म्हणजे चारनेर व चारनेरवाडी, धारला, आमठाणा , पेडगाव, देऊळगाव बाजार, चिचवण, शिदेफळ, कोटनाद्रा, तऴणी, कासोद, जाभंई, केळगाव, आदरवाडी, कोर्याला,धावडा, अशा विविध ठिकाणी ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहेत. तसेच सध्या आद्रक बेण्याचे दर दहा हज्जार ते अकरा हज्जार रूपये प्रति किव्टल प्रमाणे एवढा भाव सध्या चालु आहेत. आसे या परिसरातले शेतकरी .
नयुम टेलर, रमेश अंभोरे , ईसरार देशमुख, सुरेश पारखे, यांनी सांगीतले.
