पोलीस शिपाई भरती सन २०२२-२३च्या पात्र उमेदवारांच्या लेखी परिक्षेबाबत

पोलीस शिपाई भरती सन २०२२-२३च्या पात्र उमेदवारांच्या लेखी परिक्षेबाबत


.प्रतिनिधि गोकुळ देवरे

धुळे -दि.५.जुलै.राज्यात पोलीस दलात विविध संवर्गातील पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे.धुळे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदाकरीता शारिरीक व मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण झालेली आहे आणि सर्व पात्र उमेदवारांना लेखी परिक्षेबाबत कळविण्यात आलेले आहे.धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक ०७.जुलै.२०२४ (रविवार) रोजी सकाळी १०:०० ते ११:३० वाजेदरम्यान धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे होणार आहे. धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन २०२२-२३च्या लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर दिनांक ०७/०७/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा.लेखी परिक्षेच्या तयारीने न चुकता उपस्थित रहावे असे मा.पोलीस अधीक्षक, धुळे यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने