परिचारिका हर्षदा चौधरींनी वाचवले पोलीस कर्मचारी साळुंखेचे प्राण.


परिचारिका हर्षदा चौधरींनी वाचवले पोलीस कर्मचारी साळुंखेचे प्राण.प्रतिनिधि गोकुळ देवरे 

धुळे - दि.३जुलै.२४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील न्यायालयात बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी भाईदास साळुंके यांना हृदयविकाराचा झटका आला.या वेळी त्यांच्या पल्स बंद झाल्या. त्यावेळी कामानिमित्त कोर्टात आलेल्या परिचारिका हर्षदा चौधरी यांनी कार्डियल पंपिंग करून साळुंके यांचे प्राण वाचवले.साळुंके यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी मला जीवनदान देणारी माझी दुसरी आई अशा शब्दात परिचारिका चौधरी यांचे आभार मानले. पोलिस प्रशासनाने परिचारिका चौधरी यांचा सत्कार केला.शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भाईदास साळुंके हे बुधवारी न्यायालयात बंदोबस्तावर होते.यावेळी अचानक त्यांच्या छातीत तीव्रकळ आली.त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते अत्यवस्थ झाले.त्यांच्या पल्स बंद पडल्या याचवेळी न्यायालयात कामानिमित्त हर्षदा माणिक चौधरी वय २५.रा. श्रीकृष्ण नगर,चितोडरोड या आल्या होत्या.एका खासगी रुग्णालयात हर्षदा चौधरी नर्स आहे.त्यांनी परिस्थिती ओळखून भाईदास साळुंके यांच्यावर कार्डियल पंपिंगने प्रथमोपचार केले.त्यामुळे त्यांच्या पल्स पुन्हा सुरू झाल्या.यावेळी बंदोबस्तावर असलेले कर्मचारी विजय जडे,अविनाश पाटोळे व इतरांनी तत्काळ जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात साळुंखे यांना दाखल केले.वेळीच उपचार मिळाल्यामुळे भाईदास साळुंके यांचे प्राण वाचले‌.त्यांची प्रकृती गुरुवारी स्थिर झाली.त्यानंतर जीवनदान देणाऱ्या हर्षदा चौधरी यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्रार काढले.मला जन्म देणारी दुसरी आई अशा शब्दात त्यांनी हर्षदा चौधरी यांचा गौरव केला.पोलिस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलिस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांनी परिचारिका हर्षदा चौधरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने