घाटनांद्रा ते तिडका राज्य मार्गावर नुस्ती खडी टाकून खड्डे बुजण्याचा प्रयत्न: थातुरमाथुर डागडुगी रस्त्यांची झाली दैनिवव्साथा:
कदीर पटेल घाटनांद्रा प्रतिनिधि: सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते तिडका या बारा किलोमीटर राज्य मार्गाची डांग डुगी अत्यंत थातुरमूथुर केली असुन रस्त्यावर तशीच खडी पडुन असल्याचे आरोप वाहनधारकाकडुन होत आहे. घाटनांद्रा ते तिडका राज्यमार्ग असुन या राज्य मार्गावर दिवस भर वाहानाची वर्ळद असते . या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खडे पडलेले आहेत. तरी पण सार्वजानिक बांधकाम उप विभागाने फर्दापुर अंतर्गत येणार्या या रस्त्यांची डाग डुगी ही डांबर मिश्रित खडीने करायला पाहिजेत होती मात्र संबंधित ठेकेदाराने तसे न करता खडड्डामांध्ये नुस्ती खडी टाकल्याचे आरोप नागरिकांतुन होत आहे. या उघड्या पडलेल्या खडीमुळे आपघाताची भिती होत आहे. संबंधित ठेकेदाराकडुन सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्यरीत्या काम करून घेण्याची मागणी वाहनधारकांनी व ग्रामस्थामंधुन करण्यात येत आहे.तसेच हे घाटनांद्रा ते तिडका राज्यमार्ग म्हणजे मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावर आहे. व डोंगरच्या खाली खान्देश भाग लागतो हां राज्य मार्ग म्हणजे गुजरात, राजस्थान , आमदाबाद, बडोदा,एम पी,युपी, जाण्यासाठी जवळचा समजला जातो. छत्रपति संभाजीनगर ते परराज्यात जाण्यासाठी शॉटकट मार्ग माणला जातो आसे वाहनचालक सांगतात या राज्यमार्गवरून जाणे म्हणजे वेळ व डिजेल यांची पण बचत होते आसे वाहनचालकाचे म्हणने आहेत.