भाव चांगला मिळण्यासाठी बळीराजाला अपेक्षा: घाटनांद्रासह परिसरात मिर्चीचे व अद्रकचे लागवड क्षेत्रात वाढ:

भाव चांगला मिळण्यासाठी बळीराजाला अपेक्षा: घाटनांद्रासह परिसरात मिर्चीचे व अद्रकचे लागवड क्षेत्रात वाढ: 


कदीर पटेल घाटनांद्रा प्रतिनिधि: 

सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात मिर्ची व अद्रक पिकालाच चांगला भाव गेल्यां वर्षी मिळाल्याने यंदा घाटनांद्रासह परिसरात म्हणजे. धारला, चारनेर व चारनेरवाडी, धावडा, शिदेफळ, कोटनांद्रा‌,देऊळगाव बाजार, चिंचवण,पेडगाव, शिदेफळ ,जाभंई , केळगाव, सावखेडा, तळणी, या गावामध्ये मिर्ची व अद्रकची लागवड क्षेत्रात वाढ असल्याचे सध्या चित्र पाहवयास मिळत आहेत. तसेच एप्रील महिन्याच्या सुरुवातीपासुनच सुरू झालेली मिर्ची लागवड अद्दापही सुरू आहे. मुंदवाडी,धावडा, आमठाणा , घाटनांद्रा आदि परिसरातील रोपवाटीकेमध्ये सध्या मिर्ची रोप उपलब्ध नाही. बहुतांश शेतकर्यानी (१) ते (१५) एप्रीलपर्यत मिर्ची लागवड केलीली आहे. 

( यंदा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला) 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिर्ची लागवड खर्च वाढल्याचे पेडगावचे शेतकरी. सुरेश पारखे,चारनेर गावातले शेतकरी नयुम पटेल ( टेलर) सह इतर शेतकर्यानी सांगीतले. तसेच रोप आणि मल्चिंग व खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली दिसत आहे. यातच मजुरांचा तुटवडा त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशी परस्थिती राहीली तर मिर्ची तोडणी कशी होईल ही भीती आहे. तसेच जुनच्या पहिल्या आठवड्यात तोडणीला सुरूवात होईल. ( अद्रक लागवड क्षेत्रातही वाढ) सध्या आद्रक पिकांला सहा ते आठ हजार रूपये प्रति किव्टल प्रमाणे भाव असल्याने पारंपारिक मक्का  आणि   कापूस क्षेत्राला फाटा देत बहुताश शेतकरी मिर्ची व अद्रकची लागवड करण्यावर शेतकर्याचा भर आहे. सध्या विहिरीने तळ गाढला असुन दररोज किमान दहा ते पंधरा मिनीट पिकाला पाणी देताना शेतकर्यांची दमछाक होत आहे. तालुक्यात घाटनांद्रा ते आमठाना येथील मिर्ची बाजारपेठ मोठी असुन येथुन परराज्यात मिर्ची व अद्रकची निर्यात होते. म्हणजे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, बिहार  , पंक्षीमबगाल, अशा विविध राज्यातुन व्यापारी वर्ग येऊन मिर्ची व अद्रकची खरेदी करण्यासाठी येतात तसेच मिर्ची व अद्रकच्या हंगामात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. व वाहणधारकाही भाडे मिळतात शेतकरी आपल्या शेतातून मिर्ची व अद्रकच्या पिकाला बाजारपेठे पर्यंत आण्यासाठी लहान मोठे वाहानांने आणून आपला माल विकतात यामुळे वाहनचालक व वाहधारक यांना रोजगार उपलब्ध होतो. आसे वाहनचालक व वाहधारक संजय चोतमोल,आकील पांडे, सुरेश सोनवणे यांनी सांगीतले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new