वाकोद जवळ अपघात दुचाकीस्वार ठार*
फर्दापूर ( प्रतिनिधी )हक्कानी शेख
वाकोद ता जामनेर जळगाव संभाजीनगर महामार्गावर वाकोद जवळ शनिवार दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान जळगाव कडून संभाजीनगरकडे जाणार्या चार चाकी वाहनाने दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार भगवत गौड वय 30 रा ओडिसा राज्य हा जागीच ठार झाल्याची घटना घडली.सदर मोटारसायकल स्वार हा एका लाकडाच्या सॉ मिल वर काम करणारा मजूर असून शनिवार रोजी वाकोद येथील बाजार असल्याने बाजारात खरेदीसाठी जात असताना हा अपघात झाला.अपघातानंतर गाडी चालक तेथून पळ काढून वाकोद येथे वरखेडी रस्ता त गाडी लावून पसार झाला.
पहुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत याला उपजिल्हा रुग्णालय पहुर येथे रवाना केले.व गाडीचा शोध घेतला असता.ती वरखेडी तांडा रोडवर मिळून आल्याने तीला पहुर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
