छत्रपती शिवाजी विद्यालय सिल्लोड येथे शिकलेले विद्यार्थी २४ वर्षांनंतर एकत्र.जुन्या आठवणींना दिला उजाळा.गुरू पौर्णिमा निमित्त शिक्षकांचा केला सत्कार.....
सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण.
-शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी बालपणातील मित्र, मैत्रिण व शाळेच्या आठवणी नेहमीच मनात असतात. या आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात या उद्देशाने गुरू पौर्णिमा निमित्त छत्रपती शिवाजी विद्यालय सिल्लोड येथे शिकलेले १९९९-२००० च्या बँचचे विद्यार्थी एकत्र आले. शाळेतील उपक्रमांतर्गत गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी अशा अभूतपूर्ण बालमित्रांची पुन्हा २४ वर्षानंतर भेट घडून आली आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यात आला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी २००० च्या बँचचे मुख्याध्यापक पोपट पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दळवी सर,बोडखे सर, ए जे सोनवणे, आर पी सोनवणे,आहेर सर,डापके सर,बनसोडे सर,दौड सर यांची उपस्थिती होती. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला. या वेळी शाळेतील मृत बालमिञांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
महाविद्यालयाचे दिवस संपले की प्रत्येक जण आपल्या करियर साठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो, मात्र ज्या शाळेत, महाविद्यालयात आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या गावातील विद्यार्थ्याबरोबर मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, हितगुज करावे,असे सर्वांनाच वाटते, पण प्रत्येक जण आपापल्या, नोकरीत, व्यवसायात, संसारात,व्यस्त असल्यामुळे ते शक्य होत नाही. मात्र ते अशक्यही नसते,ज्या महाविद्यालयात आपण शिकलो, घडलो,आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र मिळाले, त्या महाविद्यालयातील मित्र - मैत्रिणी गरुजना सोबत पुन्हा भेटण्याची चोवीस वर्षानी संधी चालून आली. रविवार दि २१ रोजी शिकलेल्या शाळेतच भेटण्याची योजना आखून स्नेहमीलन सोहळा आयोजित करण्यात आला. हळूहळू सर्व मित्र मैत्रिणी एकत्र जमा झाल्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. चाळीस हुन अधिक माजी वर्गमित्र एकत्र येऊन जुन्या नव्या आठवणींना उजाळा मिळाला.
आजचे मित्र केवळ ऑनलाईन पुरतेच मर्यादित.......
सोशल मीडियावर अनेक जण मित्र होतात पण ते ऑनलाईन पुरतेच मर्यादित आहे. सोशल मीडियावर जवळ न येता, सहवासात जवळ आला तर आयुष्याचं एक सोनेरी पान उघडल्यासारखा अनुभव येतो. यासाठी एकमेकांना भेटणं गरजेचं असतं. कधीतरी ऑफलाईन राहून आपण आपल्या प्रिय माणसांना मनापासून भेटू, आणि प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी मनात जपूया अशा प्रतिक्रिया यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दिल्या हसतमुख गाणी गात,आनंदी व प्रसन्नतेच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला.
यांची होती उपस्थिती.....
यावेळी माजी विद्यार्थी स्वप्नील सपकाळ,घनश्याम भवर,घनश्याम वर्मा,दिनेश काळे,ज्ञानेश्वर डवणे,ज्ञानेश्वर सुस्ते,सुगत इंगळे,अजीम सैय्यद,वसीम देशमुख,स्वप्नील जोशी,मुजाहेद खान,राजू सुरडकर,रामेश्वर लोखंडे,गणेश ताठे,अरविंद जायभाये,विजय काकडे,शेख शहानवाज,रवींद्र वाणी
ज्ञानेश्वर घोडके,भगवान हासे,विजय राजपूत,प्रमोद अग्रवाल,अभिजीत गतफणे,प्रवीण सोनवणे,राजेश(प्रीतेश) जैन,शरद जंजाळ,योगेश निकम,
शेख नदीम,शेख अजीम,नजीर पठाण,जावेद पठाण
सुनील वाकेकर,दीपक सपकाळ,जगदीश झवर,भगवान काळे,प्रशांत गाडेकर,शिवाजी गाडेकर,भूषण पाटील,योगेश कांबळे,शेख रईस छोटू,संतोष धाडगे,सोहेल कादरी यांची उपस्थिती होती.
