पत्रकार संवाद यात्रेचे धुळ्यात आगमन पत्रकार बाधवांशी संवाद.
धुळे-१ऑगस्ट.(गोकुळ देवरे)मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच साहित्यिक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने या दोन्ही महापुरुषांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.समाजाने या समाज सेवकांच्या विचारांवर वाटचाल करावी असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त करण्यात आले.
येथील वीर सावरकर मार्गावरील दैनिक आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या लगत असणाऱ्या सभागृहात आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संवाद यात्रेचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे संयोजक प्रवीण सपकाळे, सरचिटणीस विश्वास आरोटे, यांच्यासह यांनी प्रतिमांचे पूजन केले.यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत हरणे,सचिव डी बी पाटील,माजी अध्यक्ष हेमंत मदाने व योगेंद्र जुनागडे,यांनी लोकमान्य टिळक तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला.या कार्यक्रमास सदस्य पवन मराठे,सुनील निकम,मनोज बैसाणे,विजय पाठक,शोभाताई आखाडे,प्रकाश चव्हाण,अजीम शेख,जॉनी पवार,कैलास गर्दे, सुनील पाटील,सिद्धार्थ मोरे,सोपान देसले,तवाब अन्सारी,बापू अहिरे,मॅन्युअल मकासरे,दिलीप वाघ यांच्यासह असंख्य पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
