सोयगाव तालुक्यात सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
सोयगाव प्रतिनिधी : शेरू शेख | दिनांक : 02 सप्टेंबर 2025
सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे रविवारी संध्याकाळी शेतात काम करत असताना झालेल्या सर्पदंशामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तिडका शिवारातील गट क्रमांक 111 मध्ये निंदणीचे काम करत असताना रुखमाबाई शिवा जाधव (वय 60 वर्षे) यांना सर्पाने दंश केला. तातडीने त्यांना बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेचा पंचनामा व अहवाल ग्राम महसूल अधिकारी देवतुळे अप्पा यांनी तहसील कार्यालयात सादर केला आहे. रुखमाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.