कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; अंबड तालुक्यातील जामखेड येथे घडली दुर्दैवी घटना

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; अंबड तालुक्यातील जामखेड येथे घडली दुर्दैवी घटना


जामखेड (ता. अंबड, जि. जालना) | प्रतिनिधी – प्रल्हाद पांढरे
तालुक्यातील जामखेड येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, प्रभाकर उत्तमराव खरात (वय ५५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना २६ जून रोजी घडली असून, याबाबतची माहिती २७ जून रोजी दुपारी उघडकीस आली.

प्रभाकर खरात हे गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडले होते, परंतु ते संध्याकाळी व रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला असता, गावातील काही शेतकऱ्यांनी शेत गट नं. १०३६ मध्ये ते झोपलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले.

त्यानंतर नातेवाईक आणि गावकरी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यावेळी ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी विषारी औषध सेवन केल्याची प्राथमिक माहिती असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

प्रभाकर खरात यांच्यावर युनियन बँक ऑफ इंडिया, जामखेड शाखेचे तसेच काही खाजगी सावकारांचे कर्ज होते, अशी माहिती मिळाली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि दोन अविवाहित मुले असा मोठा परिवार आहे. ही घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासन आणि प्रशासनाने अशा घटनांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new