बाग्लादेशी हिंदूच्या समर्थनार्थ हिंदू म्हणून स्वयंप्रेरणेने पिंपळनेर शहर बंद व भव्य मोर्चा
पिंपळनेर-
गेल्या काही दिवसांपासून
बांग्लादेशात राजकीय उलथापालथ झाली आहे.इस्लामिक बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन जीव मुठीत घेऊन लोकतंत्र असलेल्या आपल्या भारतात आश्रय घेतला मात्र जिहादी मनवृत्तीच्या समूहांनी बांगलादेशातील हिंदू,बौद्ध, जैन,शीख,ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांवर तसेच नागरिकांवर क्रूर हल्ले चालवले आहे.तेथील हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन यांच्या घरांची नासधूस करणे,घरे जाळणे, लूटमार करणे,पुरुषांची हत्या करणे,महिलांवर बलात्कार अत्याचार करणे,व त्याचे जाहीर प्रदर्शन करणे अशा प्रकारचे माणुसकीला काळे फासणारे कृत्य सुरू आहेत.बांगलादेशातील सेना व प्रशासन उघड्या डोळ्यांनी हा नंगानाच बघत आहे.या सर्व प्रकारात बाबत आपल्या देशातील काही व्यक्ती व समूह जिहादी मनवृत्तीचे समर्थन करताना,तशी पुनरावृत्ती भारतात होईल अशी भीती दाखवताना,राष्ट्रद्रोहाचे प्रदर्शन करताना दिसत आहे.या सर्व परिस्थितीमुळे भारत देशातील हिंदू समाज प्रचंड दुःखी,क्रोधित आहे.या सर्व कृत्यांचे हिंदू समाज कडकडून निषेध करीत आहे.जगाच्या पाठीवरचा कुठलाही हिंदू हा आमचा भाऊच आहे.हीच सर्व भारतीय हिंदूंची भावना आहे. म्हणूनच या सर्व घटनांचा कडाडून निषेध करून भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंसाठी योग्य ती पावले उचलावीत तसेच राष्ट्रद्रोहाची मुक्ताफळे उधळणाऱ्या व जिहादी मानसिकतेचे लांगुन चालन करणाऱ्या देशातील व्यक्ती व समूह यांच्यावर योग्य कारवाई होण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पिंपळनेर कडकडीत बंदची हाक देण्यात आली यावेळी सर्व हिंदू बांधव, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संपूर्ण दिवस आपले सर्व व्यवसाय व्यवसायिक प्रतिष्ठान,दुकाने,कामधंदे बंद ठेवून हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या जिहादी मानसिकतेचा निषेध करण्यात आला.निषेधाचे शासनाला निवेदन देण्यासाठी सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनी जयेश खलाणे, उपनिरीक्षक यांनी चोख बंदोबस्त ठेवला.यांना दिले निवेदन*पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि जयेश खलाने यांना श्रीराम मंदिराचे सर्वेक्ष्वरदास महाराज व विद्यार्थीनींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.अत्यावश्यक सेवा सुरू*
पिंपळनेर शहर बंद दरम्यान अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याने सकाळपासून दवाखाने, मेडिकल,बससेवा सुरळीत सुरु होती.मात्र,प्रवासी नसल्याने बसस्थानकातही शुकशुकाट दिसून आला परिसरही ओस पडल्याचे दिसून आले. दरम्यान,बंदमध्ये शहरातील चहा,नाश्ता विक्रेतेही सहभागी झाले होते.परिणामी,सकाळी मजुर वर्गाला चहा, नाश्त्यासाठी भटकंती करावी लागली.मात्र,सर्वत्र बंद असल्याने त्यांना माघारी परतावे लागले.
छाया:अंबादास बेनुस्कर
