महिलेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी: कन्नड तालुक्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

महिलेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी: कन्नड तालुक्यातील संतापजनक प्रकार उघडकीस


(पिशोर प्रतिनिधी – अस्लम शेख)

कन्नड तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या जिवावर बेतल्याची संतापजनक घटना १५ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात रात्री ७:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला एकटी पाहून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिच्या नकारानंतर आरोपीने तिचा हात पकडून जबरदस्ती केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 224/2025 नुसार भारतीय नवीन फौजदारी कायदा (BNSS) अंतर्गत कलम ७४, ७५, ३५७(१)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास सपोनी शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका दत्तू लोखंडे करीत आहेत.

या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा – www.gs9n.com


Post a Comment

أحدث أقدم

poads

new