सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी गोर बंजारा समाजाची पुढाकाराने हालचाल; लवकरच पुतळा येरवड्यात

सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी गोर बंजारा समाजाची पुढाकाराने हालचाल; लवकरच पुतळा येरवड्यात


(जळगाव प्रतिनिधी - महेश जाधव)
क्रांतिकारी संत, सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी गोर बंजारा समाजाने आता निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल पोरागड येथे समाजाचे धर्मगुरू बापू सिंग महाराज, जितेंद्र महाराज, सुनील महाराज आणि कबीरदास महाराज यांनी पुतळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन स्मारक संदर्भात सखोल चर्चा केली.

बैठकीत सद्गुरु सेवालाल महाराज यांचा पुतळा लवकरच पुण्यातील येरवडा परिसरात बसवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यामुळे संपूर्ण गोर बंजारा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ही बाब समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

या पुढाकाराबद्दल बापू सिंग महाराज व अन्य धर्मगुरूंचे पुतळा समितीने आणि समाजातील सर्व स्तरातील सदस्यांनी मनापासून आभार मानले.

लवकरच एक विस्तृत समाजभेट घेऊन स्मारकाच्या उभारणीस अंतिम स्वरूप देण्याचा मानस आहे.


Post a Comment

أحدث أقدم

Recent

Random Post