राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत

पिंपळनेर, दि. 15 (प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर) – स्वतंत्र भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे दिमाखात साजरा करण्यात आला. 2022 पासून सुरू असलेल्या "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा"च्या सुवर्णकाळाचे आपण साक्षीदार असल्याचा अभिमान व्यक्त करत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला पिंपळनेर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष एपीआय श्री किरण बर्गे, संस्थेचे अध्यक्ष श्री संभाजी अहिरराव, उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम शेठ कोठावदे, श्री भालचंद्र आनंदा ततार, श्री देवेंद्र विश्वनाथ कोठावदे, श्री महेशभैय्या पाटील, श्री सतीश लक्ष्मण पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर एखंडे, तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शिक्षक व माजी सैनिक मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणापूर्वी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत सादर करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविकेत स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

शाळेतील बालगोपाळांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीत, नृत्य आणि मर्दानी खेळ सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सूत्रसंचालन श्री अमोल अहिरे आणि विपुल गुजराती यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

(छायाचित्र : अंबादास बेनुस्कर)


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new