पिशोर येथील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू
पिशोर सर्कल (प्रतिनिधी)असलम शेख
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील जाधव धाब्या जवड ट्रॅक्टर व तीनचाकी रिक्षाचा अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.सांडू दगडु खडके (६५ रा.पिशोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंडईचा भाजीपाला माल आणण्यासाठी खडके हे पिशोरहून संभाजी नगर येथे नेहमी प्रमाणे आपला माल खरीदीसाठी गेले होते. खरेदी केलेला भाजीपाल्याचा माल घेऊन परत येत असताना पिशोर जवळील जाधव ढाब्या नजीक ट्रॅक्टर व रिक्षाचा अपघात होऊन खडके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तपासून मयत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची नोंद पिशोर पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार वसंत पाटील हे करीत आहे.