निजामपूर पोलिसांच्या नावाने लाच स्वीकारणारा बळसाने येथील पोलीस पाटील गजाआड

निजामपूर पोलिसांच्या नावाने लाच स्वीकारणारा बळसाने येथील पोलीस पाटील गजाआड


पिंपळनेर,दि.7(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर) साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोषारोपपत्र वेळेवर दाखल करण्यासाठी पोलिसांच्या वतीने दोन हजाराची लाच स्वीकारणाऱ्या साक्री तालुक्यातील बळसाने येथील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील तक्रारदार हे बळसाने गावातील रहिवासी असून त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  सदर गावातील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांना भेटून तक्रारदार यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्याकरीता पोलिसला 10 हजार  रुपये द्यावे लागतील, असे सांगून  पोलिसांच्या नावाने लाचेची मागणी केल्याची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सचिन साळुंखे यांना मिळाली.या तक्रारीची पडताळणी केली असता  पोलीस पाटील यांनी तक्रारदार  यांच्याकडे पोलिसांच्या नावाने 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8 हजार  रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच कर्मचारी राजन कदम, प्रविण मोरे, संतोष पावरा , प्रशांत बागुल ,मकरंद पाटील, प्रविण पाटील यांनी सापळा लावला.
यावेळी पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेच्या रकमेंपैकी पहिला हप्ता 2 हजार  रुपये पंचांसमक्ष स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new