बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी लघुउद्योग सुरू करावेत – आमदार मंजुळाताई गावित यांचे आवाहन

बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी लघुउद्योग सुरू करावेत – आमदार मंजुळाताई गावित यांचे आवाहन


पिंपळनेर, दि. २२ (साक्री तालुका प्रतिनिधी 


अंबादास बेनुस्कर):

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती साक्री आणि वसुंधरा महिला प्रभागसंघ छडवेल-कोडे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ. मंजुळाताई गावित होत्या.

या प्रसंगी उपस्थित महिलांशी संवाद साधताना आमदार गावित म्हणाल्या, "महिलांना लहानपणापासून बचतीची सवय असल्याने शासनाने महिलांसाठी बचत गट योजना सुरू केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी चटणी, पापड, शेवया अशा घरगुती व लघुउद्योगांची सुरुवात करून आर्थिक स्वावलंबन साधावे."

तसेच त्या पुढे म्हणाल्या, "आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी करणाऱ्या महिलांना वेळ नसतो. त्यामुळे त्या सहजपणे बाजारातून अशा वस्तू खरेदी करतात. त्यामुळे घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्याचा मोठा फायदा मिळू शकतो."वसुंधरा महिला प्रभागसंघामध्ये एकूण ४२२४ कुटुंबांचा समावेश असून १३ ग्रामपंचायती व १४ ग्रामसंघ अंतर्भूत आहेत. ३०६ गटांना खेळते भांडवल मिळाले असून, याची एकूण रक्कम ४५.९० लाख रुपये इतकी आहे. मागील वर्षी बँकांनी १३६ गटांना कर्ज वाटप केल्याची माहिती प्रास्ताविक करताना संघाच्या अध्यक्षा श्रीमती मिराताई थैल यांनी दिली.यावेळी तालुका महिला बचत गट अधिकारी संतोष पगार, संदिप बोरसे, रविंद्र गांगु, सरपंच मिनाताई बेडसे, अण्णासाहेब बेडसे, सुधाताई बोरसे, जनाबाई यांच्यासह बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते महिलांना बियाणे खरेदी, शेती साहित्य आणि लघुउद्योगांसाठी धनादेशांचे वितरण करण्यात आले.छायाचित्र – अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

Recent

Random Post