मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त न्यू हायस्कूल आमठाणा येथे अभिवादन कार्यक्रम

मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त न्यू हायस्कूल आमठाणा येथे अभिवादन कार्यक्रम 



(मानक संपादक धनंजय हजारी सिल्लोड)

सिल्लोड तालुक्यातील न्यू हायस्कूल आमठाणा येथे आज भारताचे माजी राष्ट्रपती आणि “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. जी. सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विज्ञान विभाग प्रमुख श्री. एस. आर. निकाळजे, श्री. डी. जी. हजारी, श्री. आर. बी. गवळी यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडत, डॉ. कलाम यांचे जीवनचरित्र, त्यांच्या संशोधन कार्याची व देशसेवेची माहिती दिली. विज्ञान क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्यामुळे डॉ. कलाम यांनी भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

मुख्याध्यापक श्री. सोमवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. कलाम हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कर्तृत्वातून आणि साध्या जीवनातून आपल्याला मेहनत, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीचा आदर्श घ्यावा.”

कार्यक्रमात शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. हजारी डी. जी. यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. निकाळजे एस. आर. यांनी मानले. शेवटी सर्वांनी डॉ. कलाम यांच्या विचारांनुसार “मोठे स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा” हा संदेश अंगीकारण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन न्यू हायस्कूल आमठाणा च्या संपूर्ण शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पडले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने