धाड-बुलढाणा रोडवरील अपघात : निष्पाप तरुणाला चिरडणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल!

धाड-बुलढाणा रोडवरील अपघात : निष्पाप तरुणाला चिरडणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल!


(धाड (प्रतिनिधी अबूजर मिर्झा) गायत्री पेट्रोल पंपाजवळ 28 जून 2025 रोजी सायंकाळी 3.15 वाजेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण धाड शहर हादरून गेले आहे. अवघ्या २५-२६ वयोगटातील शेख सुलतान शेख याकूब बागवान या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणात लीलँड छोटा दोस्त वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळ व वेळ:गायत्री पेट्रोल पंप, धाड-बुलढाणा रोड 28 जून 2025, सायं. 3:15
अपघातातील वाहनं:– लीलँड छोटा दोस्त (MH-28 AB-3432) – टीव्हीएस रायडर दुचाकी (MH-28 CB-3684) घटनेचा तपशील:शेख सुलतान हा आपल्या दुचाकीने नेहमीप्रमाणे धाडकडे येत असताना, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या लीलँड लोडिंग वाहनाने थेट धडक दिली. धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुलतानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नसून निष्काळजीपणाचा थेट बळी असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.पोलीस कारवाई:
धाड पोलीस स्टेशनने तत्काळ पुढाकार घेत गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा क्रमांक: 196/2025 कलमे: भा.दं.सं. 281, 125(b), 106(1) BNS दाखल अधिकारी: पोहेका संदीप सुरडकर
तपास अधिकारी: नापोका श्रीकृष्ण चव्हाण आरोपी: प्रशांत गजानन रोठे (वय 27, रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) जनतेत संतापाचे वातावरण:या अपघाताने संपूर्ण धाड शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून सवाल केला जात आहे की, हा अपघात होता की बेशिस्त, बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे घडलेला खुनी प्रकार? एका कुटुंबावर काळ ओढवणाऱ्या या घटनेमुळे वाहतूक यंत्रणांची निष्क्रियता देखील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.मागण्या:– आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी – मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा– शहरात ट्राफिक नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे व्हावी
पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू असून, नागरिकांनी संयम राखून न्यायाची वाट पाहावी असे आवाहन करण्यात आले आहे.
📰 अधिक अपडेटसाठी वाचा: gs9n.com
📱 GS मराठी न्यूज – बातमी जी भिडते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new