राहुरी पोलिसांकडून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड – सोलापूरच्या तीन आरोपींकडून ७० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

राहुरी पोलिसांकडून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड – सोलापूरच्या तीन आरोपींकडून ७० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त


भारतीय चलनाच्या हुबेहूब बनावट नोटा, मशिनरी, साहित्यासह तीन आरोपी गजाआड

राहुरी (अहिल्यानगर (तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर):
राहुरी पोलीस स्टेशन व अहिल्यानगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. सोलापूर येथील तीन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल ₹७०,७३,९२० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२८ जून २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता पाई पेट्रोलिंगदरम्यान पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काळ्या रंगाच्या होंडा शाईन (MH 45 Y 4833) वर तिघे संशयित राहुरी शहरात बनावट नोटा घेऊन येत असल्याचे समजले.

संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा रचून आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (३३, सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (४२, कर्जत), व तात्या विश्वनाथ हजारे (४०, पाटेगाव) यांना अटक करण्यात आली.

बनावट नोटा बनवणारे मशीन आणि लाखोंच्या नोटा जप्त

या तिघांकडून तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णी येथील समाधान गुरव यांच्या इमारतीत आरोपींनी घर भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी छापा टाकून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

  • ₹५०० च्या बनावट नोटांचे ७५ बंडल – ₹३७,५०,०००
  • ₹२०० च्या बनावट नोटांचे ४४ बंडल – ₹८,८०,०००
  • कट न केलेल्या नोटांच्या प्रती – ₹१८,००,०००
  • एक्सेरॉक्स मशिन, प्रिंटर, कटर, नोटा मोजण्याचे मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट – एकूण किंमत ₹५ लाख

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹७०,७३,९२० आहे.

पूर्वीच्या गुन्ह्यांत २२ महिने तुरुंगवास

आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी कुडूवाडी पोलीस स्टेशन (सोलापूर) येथे गु.नं. ५०३/२०२२ अन्वये गुन्हा दाखल होता. त्यांनी या गुन्ह्यात २२ महिने तुरुंगवास भोगला आहे.

कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोउपनि. संदीप मुरकुटे करत आहेत.


👉 अशीच अधिकृत व खात्रीशीर माहिती वाचा – www.gs9n.com
📰 “सिल्लोड एक्सप्रेस” आणि “जी एस मराठी” वर आपली बातमी पोहोचवा


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new