बालिकेस पळवुन अत्याचार करणा-या नराधमास पुणे येथुन अटक;निजामपुर पोलीसांची कारवाई पिंपळनेर,दि.7(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांनी 12ऑक्टोंबर रोजी तक्रार


बालिकेस पळवुन अत्याचार करणा-या नराधमास पुणे येथुन अटक;निजामपुर पोलीसांची कारवाई पिंपळनेर,दि.7(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांनी 12ऑक्टोंबर रोजी तक्रार

दिली की,त्यांची पिडीत मुलगी वय 16 वर्षे 20 दिवस हिला 10 ऑक्टोबर 2024 रोजी शाळेचे बाहेरुन कुणीतरी अज्ञात

इसमाने फुस लावुन पळवुन नेले बाबत दिलेल्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन-290/2024 भा. न्या.सं.का-2023 चे क.137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसतांना सदर गुन्ह्याचा तांत्रीक

मदतीच्या आधारे तपास करुन सदर अल्पवयीन मुलगीस आरोपी सागर राजेंद्र गवळे रा.कोठली ता.शहादा जि.नंदुरबार

हा मांडवगण फराटा ता.शिरुड जि.पुणे येथे पळवुन घेवुन गेला असल्याची माहीती समजल्याने त्यास निजामपुर पोलीस

पथकाने मांडवगण फराटा ता. शिरुड जि.पुणे येथे जाऊन  रात्री ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात वाढीव कलम भा.न्या.सं.

क.64(1) लैंगिक अपराधापासुन बालकांचे सरंक्षण अधिनियम 2012 चे क.4,8,12 प्रमाणे वाढ करुन गुन्ह्यातील आरोपी सागर राजेंद्र गवळे यास अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे,पोलीस अधिक्षक,धुळे किशोर काळे,अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे,एस.आर.बांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री,पोनि श्रीराम पवार, स्थागुशा धुळे,यांचे मार्गदर्शनाखाली

निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मयुर एस.भामरे,पोउपनी प्रदीप सोनवणे,पोउपनी यशवंत

भामरे,असई संजय पाटील स्थानिक गुन्हा शाखा धुळे,पोहेकॉ नारायण माळचे,पोहेकॉ आर.यु.मोरे,पोहेकॉ

प्रदीपकुमार आखाडे,पोकॉ पृथ्वीराज शिंदे,पोकॉ सुनिल अहिरे,पोकॉ परमेश्वर चव्हाण,पोकॉ अमोल

जाधव स्थानिक गुन्हा शाखेच्या धुळे यांचे पथकाने केली आहे.


छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने