उपोषणाचा इशारा देत एकता ग्रुपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रायपूर

रायपूर गावाच्या हद्दीत गतिरोधक बसविण्याची मागणी (धाड प्रतिनिधी अबूजर मिर्झा) 


उपोषणाचा इशारा देत एकता ग्रुपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बुलडाणा : हातणी–दुधा राष्ट्रीय महामार्गावरील रायपूर गाव हद्दीत रबरचे गतिरोधक तातडीने बसविण्यात यावेत, अशी मागणी एकता ग्रुप रायपूरच्या वतीने जिल्हाधिकारी व रस्ता सुरक्षा समितीकडे करण्यात आली आहे. गतिरोधक बसविण्यात आले नाहीत, तर उपोषणाचा इशारा एकता ग्रुपने दिला आहे.

सदर महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या रस्त्यावर सैलानी बाबा तीर्थक्षेत्र, जिजाऊ इंग्लिश स्कूल, शिवाजी हायस्कूल, प्रथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, आठवडी बाजार, खाजगी दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाना, पेट्रोल पंप, कोचिंग क्लासेस व अनेक व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः संध्याकाळी ४ ते ८ वाजेदरम्यान मंडीटच जाणाऱ्या पीकअप व आयशर वाहनांचा भरधाव वेगामुळे अपघातांचा धोका वाढतो. या पूर्वीही अशा वाहनांमुळे गंभीर अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे.

वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रबरचे गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या वेळी एकता ग्रुप रायपूरचे अध्यक्ष मो. फयाज मो. एजाज, उपाध्यक्ष मुकीम शाह कलीम शाह, सचिव शे. अजहर शेख अफसर, तसेच राजू नेता, शेख मजहर, इमरान खान, रेहान खान, शेख साहील, शहेजाद खान, सय्यद अनिस, शे. अयान, नसीम शाह, फारूक खान, आसिफ खान, शेख रिजवान, शेख जावेद यांसह इतर सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new