कन्नड तालुक्यातील पिशोर येथे अंजना नदीत पडलेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा अखेर चौथ्या दिवशी

कन्नड तालुक्यातील पिशोर येथे अंजना नदीत पडलेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी सापडला आहे.(पिशोर प्रतिनिधी अस्लम शेख)


सोमवारी (दि.२९ सप्टेंबर) श्रावण निवृत्ती मोकासे हा मुलगा रस्त्याने जात असताना पाय घसरून नदीत पडला होता. त्यानंतर सलग तीन दिवस राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक अर्थात एनडीआरएफने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, परंतु बुधवारीपर्यंत काहीही सुगावा लागला नव्हता.गुरुवारी सकाळी शेतकरी हरुन शेख आणि रावसाहेब निकम हे दुध काढण्यासाठी शेतात जात असताना, कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ झाडांच्या फांद्यांमध्ये मुलाचा मृतदेह अडकलेला दिसला. त्यानंतर तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला असून सकाळी शफेपुर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.या दुर्दैवी घटनेमुळे पिशोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आपण पाहत होता जी एस मराठीची विशेष बातमी.यू ट्यूब वर पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇सर्च करा https://www.youtube.com/@GS9MN

Post a Comment

أحدث أقدم