न्यू हायस्कूल आमठाणा येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी मिरवणूक संपन्न

न्यू हायस्कूल आमठाणा येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी मिरवणूक संपन्न

(प्रतिनिधी : श्री ए. एस. विसपुते)


सिल्लोड तालुक्यातील न्यू हायस्कूल आमठाणा येथे शनिवार, दिनांक 5 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या शुभदिनानिमित्त पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या दिंडीमुळे संपूर्ण आमठाणा गाव भक्तिमय वातावरणात न्हालं. विठ्ठलाच्या पालखीचे पूजन गावातील महिलांनी करून पंढरपूरची अनुभूती घेतली.

विशेष आकर्षण ठरलेले विठ्ठल-रुखमाईची वेशभूषा परिधान केलेली वैष्णवी शिंदे व जानवी चाथे, विणेकरी पृथ्वी लोखंडे आणि मृदुंग वादक कार्तिक मोजे यांनी वातावरण अधिक भक्तिमय केले.

दिंडीची सुरुवात शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील कदम यांनी नारळ फोडून केली. या दिंडीचे स्वागत आमठाणा ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ पाटील कदम, उपसरपंच प्रवीण सोमासेमाजी सरपंच अरुण पाटील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

दिंडीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी भजनं म्हटली, पावली खेळली, आणि फुगडीचा आनंद लुटला. कार्यक्रमाचा समारोप शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. जी. सोमवंशी यांनी केला. यावेळी हजारी डी. जी. सर यांनी विद्यार्थ्यांना वारीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगितले.

या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागाने यशस्वीरीत्या पार पडले.


🌐 gs9n.com | सिल्लोड एक्सप्रेस



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new