60 कोटींच्या खंडणी प्रकरणात रोहिलगड पतसंस्थेचा मॅनेजर अटकेत; नागरिकांचे पैसे अद्यापही गायब!
(रोहिलगड सर्कल प्रतिनिधी अस्लम रहीम शेख) – जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलगड येथील जनता नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेतील तब्बल 60 कोटींच्या खंडणी प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. संस्थेचा मॅनेजर असलम रहीम शौक (रा. अंबड तालुका, जि. जालना) याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्या कुटुंबियांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असलम शौक मागील तीन वर्षांपासून रोहिलगड येथील पतसंस्थेचा मॅनेजर होता. त्याला दोन मुले असून त्याच्या कुटुंबालाही या प्रकरणाची माहिती नव्हती. संबंधित प्रकरणात एका मुलीचे अपहरण करून तब्बल 60 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
मुलीच्या आजोबांनी अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ तपास करत त्या मुलीचा शामपर्यंत शोध घेतला. या अपहरणात एक चालक आणि मॅनेजरचा एक साथीदार सामील होता. पोलिसांचा दबाव वाढताच आरोपींनी मुलीला सोडून दिले व पलायन केले.
दरम्यान, तपासादरम्यान या मॅनेजरने सुमारे दीड कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले असून त्याला अटक करून औरंगाबाद कारागृहात ठेवण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि ठेवीदारांनी यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या असून, रोहिलगड येथील लोकांचे पैसे नेमके कुठे गेले? याबाबत अजूनही स्पष्टता नाही. नागरिकांनी प्रशासनाकडे याची चौकशी करून पैसा परत मिळावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
📝 अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट्स देण्यात येतील.