निंभोरा गणात आमदार संजनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय साहित्य वाटप उपक्रम उत्साहात संपन्न
बातमी:
निंभोरा गणातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आमदार सौ. संजनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते अनिल आप्पाराव घुगे यांच्या पुढाकाराने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याची बाटली, पेन, पेन्सिल व कंपास सेटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम रामनगर, साखरवेल, खातखेडा, वासडी, निंभोरा, तपोवन, मेहगाव, हसता येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात आला.
खातखेडा येथील १५० विद्यार्थी, रामनगर येथील २०० विद्यार्थी तर साखरवेल येथील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
कार्यक्रमाला अनिल घुगे, राजू मोकासे सर, सरपंच ज्ञानेश्वर पवार, विलास पवार, राजेंद्र पवार, दीपक आखाडे, पप्पू पवार, दत्तू घाडगे, विलास खुर्द, भगवान काजे, गोविंद महाराज निकम, गजानन घुगे, रामभाऊ सोळुंके, देवमन घुगे, संतोष घुगे, नंदू घुगे, किशोर घुगे, रमेश निर्मळ, संजय भागिनाथ घुगे, प्रशांत नागरे, जितेंद्र अप्पाराव घुगे, सुनील नवले, सूर्यकांत मोकासे, बंडू अण्णा, नानेश्वर, प्रशांत निर्मळ सोनवणे, गणेश पवार, विनोद जाधव, सागर रमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल घुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“आमदार संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गटातील प्रत्येक शाळेसाठी २५ लाख रुपयांची डिजिटल लायब्ररी लवकर उभारण्यात येणार आहे. त्याच प्रेरणेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.”
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजू मोकासे सर यांनी सांगितले,
“मी स्वतः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक होतो. समाजसेवेची आवड असल्यामुळे निवृत्तीनंतरही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. आज दिलेले साहित्य ही केवळ सुरुवात आहे, भविष्यात आणखी मदतीचे प्रमाण वाढवले जाईल.”
हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे बळ देणारा एक सकारात्मक पाऊल ठरला असून, या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#GSMarathi | www.gs9n.com | सिल्लोड एक्सप्रेस
(पिशोर प्रतिनिधी – अस्लम शेख)