सकल जैन समाज पिंपळनेर द्वारे जैन समाजावर होणारे अत्याचार व पहलगाम हिंदू हत्याकांड निषेधार्थ
भव्य मूक मोर्चाचे आयोजन;पिंपळनेर कडकडीत बंद
पिंपळनेर,दि.24(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर) गेल्या काही दिवसापासून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात जैन धर्मियांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जैन साधूंकडून पैशाची मागणी करत मारहाण केली,विलेपार्ले येथे अतिक्रमणच्या नावाने जैन मंदिराची तोडफोड करण्यात आली,साधुसंत रस्त्यावर विहार करत असताना जाणीवपूर्वक कट मारून अपघात घडवून आणण्यात येत आहे,परवा पहलगाम काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली अशा सर्व घटनेने संपूर्ण जैन समाज व हिंदू समाज दुखावला गेला असून शासनातर्फे दोषींवर कडक शासन करण्यासाठी व सदरील सर्व घटनांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आज पिंपळनेर येथील सकल जैन समाजातर्फे पिंपळनेर कडकडीत बंद करत निषेध मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात सटाणा रोडवरील महाविर भवन पासून करण्यात आली. शांततेत मार्गक्रम करत सटाणारोड,बसस्टॅंड,भावसार गल्ली,खोलगल्ली,गांधी चौक येथून तहसील कचेरी पर्यंत मोर्चाचे समापन करण्यात आले समारोप वेळी धनराज जैन यांनी सर्व घटनेच्या उल्लेख करत व मोर्चाचे महत्त्व विशद करत सूत्रसंचालन केले,महावीर गोगड,अशोक कोचर यांनी इतर अनेक घटनांच्या उल्लेख करत निषेध व्यक्त केला.अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देत दोशींवर कडक शासन करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.निवेदनावर राजस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोगड,सचिव जीवन खिवसरा,जैन नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अजित गोगड,सचिव कमलेश गोगड,धनराज जैन,कुंदनमल गोगड,मोहन गोगड,केशरमल गोगड,सुभाष राका,महावीर गोगड,तुषार चोरडिया,नितीन बुरड,कैलास गोगड,दिनेश जैन,रिखब गोगड,अशोक कोचर,कपिल टाटीया, आदित्य टाटीया,नेमीचंद जैन,हर्षल गोगड,सनी राका, मनीष टाटिया,योगेश नेरकर, ज्ञानेश्वर एखंडे,प्रमोद गांगुर्डे, माधव पवार,जेटी नगरकर, अनिल जैन,सतीश गांगुर्डे,अमोल पाटील,अविनाश पाटील,प्रशांत कोठावदे, भालचंद्र बेनुस्कर,अनिल गायकवाड,सुनंदा संघवी,मंगला कोचर,डॉ. प्रतीक्षा चोरडिया,जयश्री गोगड,रेखा गोगड,अश्विनी चोरडिया,रिंकू टाटीया, करिष्मा गोगड,सुवर्णा गोगड, शोभा कोचर,शीतल राका, कोमल बुरड,भाग्यश्री टाटिया, पायल टाटीया,निशा ओस्तवाल,साक्षी टाटीया यांच्या सह्या होत्या
त्यासोबतच समाजातील सर्व सदस्यांचे सह्यांचे निवेदनही सोबत देण्यात आले मोर्चा यशस्वीतेसाठी राजस्थान पंच मंडळ,जैन नवयुवक मंडळ,जैन महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम केले.छाया:अंबादास बेनुस्कर