ऊस-मक्याच्या पिकांत बिबट व पिल्ल्यांची हालचाल: शेतकऱ्यांनी संयम राखावा - वनविभागाचे आवाहन

ऊस-मक्याच्या पिकांत बिबट व पिल्ल्यांची हालचाल: शेतकऱ्यांनी संयम राखावा - वनविभागाचे आवाहन


(पिशोर प्रतिनिधी | अस्लम शेख)
कन्नड तालुक्यात ऊस आणि मका यांसारख्या दाट पिकांमध्ये अलीकडे बिबट आणि त्याच्या पिल्ल्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कन्नड वनविभागाने शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बिबट्याची पिल्ले दिसल्याची माहिती दिल्यानंतर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांनी पुढील महत्वाच्या सूचना दिल्या आहेत: “बिबट्याच्या पिल्लांचा पाठलाग, स्पर्श किंवा त्यांना हलवण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. मादी बिबट नेहमी पिल्ल्यांच्या आसपास असते. त्यामुळे अशा वेळी ती आक्रमक होऊन हल्ला करू शकते.”

टोम्पे यांनी पुढे स्पष्ट केले की, निसर्ग व वन्यजीव यांच्यातील सहजीवन राखणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वर्तन करत कोणतीही घाई किंवा असावधानता टाळावी. हे केवळ आपल्या सुरक्षेसाठीच नाही तर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी देखील आवश्यक आहे.

वनविभागाच्या महत्त्वाच्या सूचना:

  • बिबट किंवा पिल्ले दिसल्यास त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.
  • सुरक्षित अंतर राखून वनविभागाला त्वरित कळवा.
  • 1926 या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
  • शांतता राखा आणि वनविभागाशी सहकार्य करा.

वनविभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणतीही गैरप्रकाराची किंवा घाईची कृती शेतकऱ्यांच्या आणि वन्यजीवांच्या दोघांच्या सुरक्षेला धोका ठरू शकते.


🟢 तुम्ही बिबट्याचे दर्शन केले असल्यास, कृपया 1926 वर कॉल करा आणि लगेच माहिती द्या.
🟡 शेती करताना खबरदारी घ्या आणि एकटे काम करण्याचे टाळा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Recent

Random Post