दुचाकी बैलगाडी अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू*

दुचाकी बैलगाडी अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू*



पिशोर प्रतिनिधि असलम शेख पीशोर सर्कल प्रतिनिधी पिशोर  सिल्लोड रस्त्यावर पिशोर जवळ खडकी नदी पुला नजिक दुचाकीने बैलगाडीला पाठीमागून ठोकल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. जयेश माधवराव जाधव (वय १६, रा. पिशोर कसबागल्ली) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, पिशोर जवळच्याच जवखेडा (बु) येथे नात्यातील लग्न असल्याने जयेश या लग्नाला जात होता. दरम्यान खडकी नदी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या जयेशच्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की बैल गाडीचा साठा तुटून दोन तुकडे झाले. या अपघातात जयेश गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सोनम जाधव यांनी त्याला तपासुन मृत घोषित केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Recent

Random Post