निवाणा गावात रक्तरंजित हल्ला; तरुणाची निर्घृण हत्या
बुलढाणा (प्रतिनिधी सय्यद इरफान):
संग्रामपूर तालुक्यातील निवाणा गावात काल (२८ ऑगस्ट) रात्री उशिरा एक धक्कादायक व रक्तरंजित घटना घडली. यात एका २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
घटनेचा तपशील
प्रज्वल सुभाष मोहे (वय २५, रा. निवाणा) यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. २९२/२०२५ नोंदविण्यात आली आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घरात शिरून कुटुंबीयांना मारहाण केली तसेच “सोपान दिगंबर सोळंके याच्यावर असलेली विनयभंगाची केस मागे घ्या” अशी धमकी दिली.
या दरम्यान, आरोपींनी धारदार हत्यारांनी वार करून फिर्यादीचा भाऊ ऋषिकेश सुभाष मोहे (वय २७) याची हत्या केली. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींची नावे
या प्रकरणात पोलिसांनी एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये –
- मंगलसिंग जालमसिंग सोळंके
- जीवनसिंग झामसिंग सोळंके
- वैभव मोहनसिंग सोळंके
- अमोल जीवनसिंग सोळंके
- सुरज मंगलसिंग सोळंके
- आकाश मंगलसिंग सोळंके
- ईश्वर उर्फ बारक्या मोहनसिंग सोळंके
- मानसिंग विजयसिंग सोळंके
- राजेश विजयसिंग सोळंके
- अजय घनश्याम पवार
- दत्ता घनश्याम पवार
- महेश शिवहरी सोळंके
गुन्हा दाखल
सदर घटनेत भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, १०३(१), ११८(१), ३३३, ३५१(३) बी. येन.एस. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.