वनक्षेत्रात मध्यरात्री अवैध खोदकामावर धडक कारवाई; जेसीबी जप्त

वनक्षेत्रात मध्यरात्री अवैध खोदकामावर धडक कारवाई; जेसीबी जप्त


(पिशोर प्रतिनिधी – अस्लम शेख)
कन्नड वनपरिक्षेत्र अंतर्गत कळंकी परिमंडळातील कळंकी (पूर्व) राखीव वनक्षेत्रात मध्यरात्री अवैध उत्खननावर कारवाई करत वन विभागाने जेसीबी जप्त केली आहे.

ही कारवाई दि. 15 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यानंतर कळंकी पूर्व राखीव वन कक्ष क्र. 123, गट क्र. 164 येथे करण्यात आली. आरोपी जेसीबी मालक व चालक अवैध खोदकाम करीत असताना वन विभागाने अचानक छापा टाकून जेसीबी ताब्यात घेऊन वनगुन्हा दाखल केला.

संपूर्ण कारवाई मा. उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. विशाल कवडे यांच्या देखरेखीखाली, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड श्री. शिवाजी टोम्पे, वनपरिमंडळ अधिकारी कळंकी श्री. एस. पी. कादी, वनरक्षक श्रीमती वैशाली तुपे (कळंकी पूर्व), श्री. ए. एल. नागरगोजे (पेडकवाडी), श्रीमती यशोदा साळवे (जामडी), वनमजूर श्री. देविदास राठोड व वाहनचालक श्री. भाऊसाहेब वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या प्रकरणी पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी श्री. एस. पी. कादी करीत आहेत.

वनक्षेत्रात अपप्रवेश करून अवैध उत्खनन करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. कोणीही मुरूम, वाळू, माती किंवा गारगोटीचे अवैध उत्खनन करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाने सर्व जेसीबी व ट्रॅक्टर मालक व चालकांना दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने