पिशोर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग
(पिशोर प्रतिनिधी अस्लम शेख)
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून शनिवार रोजी पिशोर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अंकुश जनार्धन लेणेकर (वय २९, रा. सारोळा) याने शनिवार पहाटे ४:३० वाजता पीडित मुलीस फूस लावून सारोळा शिवारातील कपाशीच्या शेतात नेऊन अत्याचार केला.
तसेच, हा प्रकार उघड केल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सपोनि शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे व पो.हे. विलास सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.