🚨 पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई
67 लाख 21 हजार 200 रुपयांचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त
पिंपळनेर, दि. 24 (प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत तब्बल ₹67,21,200 किमतीचा अवैध तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त केला. गुजरातहून दहीवेल मार्गे पिंपळनेर–सटाणा दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक (क्रमांक MH-18 BG 3473) पाठलाग करून पोलिसांनी पकडला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधीत स्वीट सुपारी व सुगंधीत तंबाखू असल्याची खात्री झाली. पहाटे ३ वाजता सापळा रचून पोलिसांनी ट्रकला थांबवले असता, परच्युटनच्या बॉक्सच्या आड मोठ्या गोण्या व लहान प्लास्टिक पिशव्यांमध्ये ₹43,67,200 किमतीची सुगंधीत सुपारी व तंबाखू, ₹8,54,000 किमतीचे परच्युटन बॉक्स तसेच ₹15,00,000 किमतीचा ट्रक असा मिळून एकूण ₹67,21,200 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 219/2025 अन्वये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👮 कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पथकात पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, भुषण शेवाळे, पोहेकां कांतीलाल अहिरे, पोकों रविंद्र सुर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, सोमनाथ पाटील, संदिप पावरा, योगेश महाले, दिनेश माळी, विजयकुमार पाटील यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.
📸 छायाचित्र : अंबादास बेनुस्कर