भाग क्रमांक 2 मधिल प्रलंबित कामे त्वरित सुरू करा-ब्रिक्स मानवाधिकार मिशन धुळे जिल्हा युवक अध्यक्ष महेश वाघ यांच्या वतीने पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनला दिले निवेदन

भाग क्रमांक 2 मधिल प्रलंबित कामे त्वरित सुरू करा-ब्रिक्स मानवाधिकार मिशन धुळे जिल्हा युवक अध्यक्ष महेश वाघ यांच्या वतीने पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनला दिले निवेदन


पिंपळनेर,दि.16(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील इंदिरानगर,संजयनगर हनुमान मंदिर चौक ते गुड्डू मालुसरे यांच्या घरापर्यंत आणि सिनियर कॉलेजच्या पाठीमागे संतोष काशिनाथ वाघ यांच्या घरापासून ते कान्हा प्रोव्हीजन पर्यंत,(जेबापूर रस्ता)अशा दोन रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याबाबत.प्रभाग क्रमांक 2 मधील महेश रमाकांत वाघ यांनी आपल्या निदर्शनास आणून दिले की प्रभाग 2 मधील दोन रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, रस्त्यांवर खड्डे आणि पावसाळ्यात चिखल साचल्याने नागरिकांना, विशेषतःवृद्ध आणि लहान मुलांना,मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांचे तातडीने काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे.
●​संजय नगर,इंदिरानगर हनुमान मंदिर चौक ते गुड्डू मालुसरे यांच्या घरापर्यंतचा रस्ता.
●​सिनियर कॉलेजच्या पाठीमागे,संतोष काशिनाथ वाघ यांच्या घरापासून ते कान्हा प्रोव्हीजन(जेबापूर रस्ता) पर्यंतचा रस्ता.
​रस्त्यांची दुरवस्था पाहता, मंजूर असलेल्या या दोन्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होईल.
प्रशासनाने याविषयाची गांभीर्याने दखल घेऊन,सदर रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा आणि काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Recent

Random Post