तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चार उत्कृष्ट प्रकल्पांची निवड-प्राचार्या सोनाली पाटील
पिंपळनेर,दि.16(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)येथील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम मार्शल आर्ट स्कूलमध्ये साक्री तालुक्यातील भामेर येथे 16 व 17 डिसेंबरला होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा,हा उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रत्येक शाळेतून चार उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव रा. ना.पाटील,चेअरमन संभाजी अहिरराव,जगदीश ओझरकर,मुख्याध्यापिका सोनाली पाटील व शिक्षक उपस्थित होते.विज्ञान प्रदर्…
