ग्रामीण भागात लोणचे तयार करण्यासाठी गुहिणीकडुन लगबग सुरू:

ग्रामीण भागात लोणचे तयार करण्यासाठी गुहिणीकडुन लगबग सुरू: 


कदीर पटेल घाटनांद्रा प्रतिनिधि: 

सिल्लोड तालुक्यातील घाटनाद्रासह परिसरात लोणचे तयार करण्यासाठी महिला मंडलाची धावपळ‌ सुरू झाली असुन. तसेच घाटनांद्रा येथुन जवळ असलेले आमठाणा अठवडी बाजारात यंदा चटकदार लोणच्याला महागाईची झळ व लोणचे तयार करण्यासाठी महिलाची आमठाणा अठवडी बाजारात तुफान गर्दी पाहवयास मिळत आहेत. तसेच यामुळे घरो घरी चटकदार गावरान कैरींच्या ( आंबा) लोणच्यांचा सुवास दाखवत आहे. मात्र गत वर्षीच्या तुलनेत कैरी (आंबा) व त्यासाठी लागणार्या मसाल्याचे भाव ( म्हणजे दर) वाढल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसली आहे. असे चित्र सध्या आमठाणा अठवडी बाजारात पाहवास मिळत आहेत. तसेच लोणच्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटतेच मग ते लिंबाचे असो की आंब्याचे पहिला पाऊस पडलाकी लोणचे बनवण्याची तयारीला सुरूवात होते. व गावरान कैरींची (आंब्याची) जागा आता कलमी आंब्याच्या कैरीने घेतली आहे. मान्सुनपुर्व पावसाच्या वादळी वार्यामुळे अनेक भागात कैरी गळुंन पडली आहे. यामुळे लोणच्याची कैरी दुरापस्त होऊन आवक अजुनही बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध दिसत आहे. कधीकाऴी परिसरात गावरान आंबा उत्पादनात अप्रेसर होता. या घाटनांद्रा भागात मोठ मोठ्या आमराईने नटलेले वैभव दिसुन येत होते मात्र कालांतराने डेरेदार आम्रवुक्षांच्या सावटाखाली शेती पिंकाचे उत्पादन कमी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर आंबाची जुनी झाडावर कुर्याड घातली गेली परिणामी परिसरात आमराई पडद्याआड झाल्या आणि यामुळे ग्रामीण भागातील घराघरात आंब्याचा घमघमाट दुरावला गेला आजमितीस बोटावर मोजण्याइतकेच शेतकर्यांकडे गावरान आंब्यांची झाडे दिस्त येत आहे. वातावरणीय बदल तसेच अवकाळीमुळे बाहुतांश आंब्याच्या झाडाच्या मोहरांवर परिणाम झाला होता. यामुळे यंदा गावरान आंब्याची गोड चव आबंट होणार असल्याने शेतकर्यातुन बोलले जात आहे. तसेच गुहिणीकडुन लोणचे तयार करण्याची लगबग सुरू झाली असुन लोणच्यासाठी लागणारे गरम मसाले सध्या तेजीत असल्याने लोणचे तयार करण्यासाठी खिशाला मोठी कात्री लागणार आहे. व ग्रामीण भागात तसेच शेतकरी कुटुबांत आजही लोणच्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. घरात पंचपक्वानांने स्वादिष्ट भोजन असले तरीही लोणच्या शिवाय या सूग्रास भोजनाला स्वाद येत नाही. यामूळे घरोघरी लोणचे घातले जाते. (१) विमलबाई पाटीलबा अंभोरे गुहिणी) पुर्वी या परिसरात आंब्याच्या झाडांची मोठी आमराई होती कालांतराने व रोगराईने तर बहुतांश आंब्याचे डेरेदार झाडे तोडल्यामुळे गावरान आंबे कमी झाले आणि घराघरातील आंब्याचा घमघमाट दुरापस्त झाला. (२) रशिदा बी देशमुख  ) गुहिणी एक किलो कैरी ( आंब्यामागे कापण्याचे दहा रुपये दर आकारले जातात. खास गावरान कैरी (आंब्याची मागणी असल्याने चांगल्या कैर्या(आंबा) मिळाल्यात म्हणुन महिलांची सकाळीच गर्दी होते आम्ही लगेच कैर्या ( आंबा) कापुनही देतो. म्हणुन गिह्राईकही इतर कुठे जात नाही.  पेडगाव येथील आंबे विक्रेते व कारागीर. 

सलीम शाहा पेडगावकर:

Post a Comment

أحدث أقدم